नवी दिल्ली: दबंग खान अर्थात सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. ‘भारत’ हा सलमान खानचा आगामी चित्रपट आहे. यात सलमानसोबत कतरिना कैफ दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लुक समोर आल्यापासूनच या चित्रपटाची उत्सुकता सगळयांना लागली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याविषयी उत्सुकता लागली आहे. ट्रेलर कधी येणार याविषयी स्वतः कतरिना कैफने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील एक फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, ट्रेलरला केवळ १० दिवस बाकी आहेत. कतरिनाने केलेल्या पोस्टनुसार २४ एप्रिलला भारतचा ट्रेलर लाँच होणार आहे. कतरिनाने ही पोस्ट केल्यानंतर आम्ही आतुरतेने ट्रेलरची वाट पाहत आहोत. भारत चित्रपटासाठी आम्ही उत्सुक आहोत असे अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे सांगीतले आहे. कतरिना कैफची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर केवळ चार तासात या पोस्टला साडेपाच लाखांहुन अधिक लोकांनी लाइक केले आहे.
‘भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़ म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़ सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात अशी या चित्रपटाची कथा आहे.