प्रतिनियुक्त्या रद्द झाल्याने मुळ अस्थापनावर जावे लागणार

0

जळगाव । पाच वर्षांपासून आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या प्रतिनियुक्त्या सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी रद्द केल्या आहे. त्यांनी सीईओंनी पदाचा कारभार स्विकारल्यानंतर हा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रतिनियुक्त्या रद्द झाल्याने कर्मचार्‍यांना मुळ अस्थापनावर जावे लागणार आहे. यासंबधीचा आढावा सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला. यात तृतीय श्रेणीच्या सुमारे 15 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये सुमारे 35 कर्मचारी हे एकाच विभागात काम करीत आहे. यामुळे अन्य पात्र कर्मचार्‍यांना नियुक्तीसाठी अडचणी येत होत्या. यानुसार कनिष्ठ सहाय्यक, स्वीय सहाय्यक, शाखा अभियंत्यांची माहिती घेत त्याचा आढावा घेण्यात आला. यात 22 कर्मचारी बदलीपात्र आढळून आले.

स्वीय सहाय्यकाला मान्यता नाही
प्रतिनियुक्त्यांबाबत नुकत्याच झालेल्या कर्मचारी तक्रार निवारण सभेत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही कार्यवाही होणार आहे. विषयसमित्यांच्या वाटपानंतर सभापतींना दिला जाणार्‍या स्वीय सहायकांच्या नियुक्त्या अद्यापही निश्चित झालेल्या नाहीत. सभापतींनी स्वीय सहायकांची नेमणूक करून घेतलेल्या आहेत. मात्र, या पदांना अद्याप मान्यता देण्यात आलेल्या नाहीत. या पदांना मान्यता देण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. स्वीय सहाय्यकपदी पाच वर्षांपासून जास्त कालावधी कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना यापदी कायम केले आहे. यावरही निर्णय घेतला जाणार आहे.

आठवड्या भरात घेणार निर्णय
बदलीपात्र कर्मचार्‍यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे नियुक्तीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे या व्यतिरिक्त अन्य जागांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यासह काही कर्मचार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने त्यावरही निर्णय घेण्यात आला. यातून कार्यालयाबाहेर प्रतिनियुक्त राहतील का याची माहिती काढण्यात आली. यातील पात्र कर्मचार्‍यांवर येत्या आठवड्याभरात निर्णय घेण्यात येणार असून शिपाईपदाबाबत फारशी अडचण नसल्याने यावरही निर्णय घेतला जाणार आहे.