चाळीसगाव । सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन सोनवणे यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या जीनवपट ‘मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील की जीवनी’ हा हिंदी ब्रेल रूपांतरीत कोलाज दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. ब्रेल रूपांतरीत कोलाजचे प्रकाशन नुकतेच 25 डिसेंबर रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते पुण्यातील निवासस्थानी करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्यास पुण्याचे माजी आमदार मोहन जोशी, राखी रासकर, निवेदिका मेघना झुझम, गजश्री सोनवणे यांची उपस्थिती होती. यावेळी गजश्री सोनवणे लिखीत ‘मातृतुल्य आदरणीय प्रतिभाई’ ही कवितारूपी मानपत्र देवून त्यांनी त्यांचा सन्मान केला.