काळभोरनगर : निसर्गरक्षण, संवर्धनासाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा, असे आवाहन सी.बी.एस.ई बोर्ड दिल्ली, पुणे विभागाचे सहसचिव सुभाष चंद गर्ग यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, काळभोरनगर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गर्ग यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाच्या संदेशाप्रित्यर्थ मॉडेल्स, रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सी.बी.एस.ई. बोर्डाचे विभागीय अधिकारी जब्बार सिंग, कनिष्ठ निरीक्षक शोएब खान, मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षिका मेघना आपटे यांनी केले. रेणूका दारवेकर यांनी आभार मानले.