प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 10 रोजी अपंग महिलांचा मेळावा

0

आमदार संजय सावकारेंच्या वाढदिवसाचे औचित्याने उपक्रम

भुसावळ- भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळामार्फत भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अपंग महिलांचा मेळावा सोमवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात होत आहे. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी अपंग महिलांच्या समस्या जाणून घेऊन अपंग महिलांना येणार्‍या समस्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून सोडवण्यासह अपंग महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अपंग महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अपंग भगिनींनी सहभाग घ्यावा नोंदवावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले आहे.