जळगाव । जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक प्रश्नाला प्रतिसाद द्या प्रतिक्रीया देऊ नका. प्रतिसाद देणारेच आयुष्यात यशस्वी होतात. प्रतिक्रिया देणारे अयशस्वी झालेले व दुखःभोगत असल्याचे दिसून येत असल्याचे सर्वत्र दिसते. असे प्रतिपादन सुरेश पांडे यांनी केले. ते शहरातील निरीक्षण गृहात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. सिखवाल महिला मंडळातर्फे निरीक्षण गृहातील अनाथ मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. जगात प्रेम करणारी माणसे कमी आहेत त्यामुळे संकटाला घाबरु नका सामना करा असा सल्लाही त्यांनी दिला. समाजासाठी काम करा समाज तुमचा उध्दार करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.