जळगाव: देशातील हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क मिळण्यासाठी भारताला ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करावे या प्रमुख मागणीसाठी 30 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 6 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत ‘नवम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे.
या अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत. हे अधिवेशन सर्वांसाठी खुले असणार असून खालील ‘लिंक्स’वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेपाळ, बंगाल आणि इंडोनेशियातील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी पुढील लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
YouTube Channel : www.youtube.com/HinduJagruti
Facebook page : https://www.facebook.com/Hindu-dhiveshan
Twitter : https://twitter.com/HinduJagrutiOrg