शिरपूर। शिरपूर शहरातील खालचे गाव येथील प्रति तिरुपती श्री बालाजी संस्थानच्या 147 वर्षांच्या परंपरा असलेल्या जीर्णोद्धार झालेल्या मंदिराच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.खालचे गाव येथील श्री बालाजी मंदिरात शुक्रवार दि. 12 मे रोजी पहाटे पासून सुप्रभातम व विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते.
शिरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते विविध कार्यक्रम संपन्न झाले. शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, श्री बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कार्याध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, कोषाध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, चिटणीस प्रभाकर कुलकर्णी, कक्कूबेन पटेल, किरणबेन पटेल, सर्व विश्वस्त, पदाधिकारी, श्री बालाजी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, समस्त बालाजी भक्त गण यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. श्री बालाजी मंदिर परिसरात भव्य मंडप टाकण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला