शिरपूर । तालुक्यातील वरुळ येथील योगेंद्रसिंग उत्तमसिंग राजपूत यांच्या हदय प्रत्यारोपन शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यकता निधीतुन 2 लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे. रोहयोमंत्री जयकुमार रावल आणि डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नाने रुग्यास ही मदत मिळाली आहे. योगेंद्रसिंग यांच्यावर मुंबई येथे शस्त्रक्रिया होणार आहे. कुटुंबीयांनी डॉ.जितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन योगेंद्रसींग राजपूत यांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. शस्त्रक्रियेसाठी 18 ते 20 लाख रुपये खर्च येणार आहे.
मंजूरीचे पत्र दिले
योगेंद्रसींह हे शेतकरी असुन एवढा खर्च त्यांच्या कडून शक्य नसल्याने मदत मिळवून देण्याची मागणी केली. राजपूत परीवाराने मंत्री जयकुमार रावल आणि डॉ.जितेंद्र ठाकूर यांचे आभार मानले. मदतनीधी मंजूरीचे पत्र देतांना डॉ.जितेंद्र ठाकूर,वरुळचे उपसरपंच नाना गिरासे, मिलींद पाटील,जगदीश पाटील,व शाम पाटील आदी उपस्थित होते.