प्रत्येक जिल्ह्यातील १०० तलाठ्यांचा होणार गौरव

0

पुणे- डिजीटल इंडियाच्या संकल्पनेला प्रोत्साहन देत येत्या महाराष्ट्र दिनी राज्यातील 30 हजार गावांच्या ऑनलाइन 7/12 चे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन 7/12 च्या या ऐतिहासिक मोहिमेत उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील 100 तलाठ्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ट्वीटरमार्फत दिली. महसूलमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली यात यात अधिकार्यांना याबाबत सुचना देण्यात आल्या.