पुणे । गुजरात निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. सोमवारी गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत विजय मिळाल्याचा जल्लोष भाजप साजरा करत असताना शहरात प्रत्येक दिवस ‘काक’डे नसतो, असा पुणेरी टोला लगावणारे फलक शहरात लागले होते. या फलकांनी पुणेकरांचे चांगलेच मनोरंजन केले.
गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर बहुतांश मतदान कल चाचणीमध्ये भाजप मोठा विजय मिळवेल असा निष्कर्ष काढला गेला. मात्र, भाजपचेच राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय काकडे यांनी, गुजरातमध्ये यावेळी भाजपला सरकार बनवण्यासाठी पुर्ण बहुमत मिळणार नाही, असे सांगितले होते. ’पुर्ण बहुमत विसरा, सरकार बनवण्यासाठी देखील पुरेसे संख्याबळ मिळणार नाही’ त्यातूनही गुजरातमध्ये भाजपचा विजय झाल्यास तो फक्त मोंदीच्या नावामुळे झालेला विजय असेही ते म्हणाले होते.संजय काकडे यांचा अंदाज चुकल्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी ‘कावळा बसायला अन फांदी तुटायला, र्एींशीू वरू ळी छेीं काक’डे’ अशा ओळी लिहलेले पोस्टर लावण्यात आले होते.