प्रत्येक फ्लेक्सवर ‘पिंपरी विधानसभेत परिवर्तन नक्की बरं का

0
पिंपरी: नगरसेवक शैलेश मोरे यांनी 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून लढविली होती. केवळ काही मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कालांतराने आझम पानसरे यांनी भाजप प्रवेश केला. त्याप्रमाणे शैलेश मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. पिंपरी विधानसभेमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार झाले, शिवसेनेचे आमदार आहेत. तरीही पिंपरी विधानसभा मतदार संघात विकासकामांची बोंब आहे. कुठल्याही कामाचे नियोजन नाही. एम्पायर इस्टेटमधील रॅम्पचा विषय आहे. या विषयाला स्थानिक आमदारांनी लक्ष दिले नाही. असे बरेच प्रलंबित प्रश्‍न आहेत. ते मार्गी का लागत नाही, याचे उत्तर नागरिकांना कोण देणार? चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाच्या मानाने पिंपरी विधानभा मतदार संघ दुर्लक्षित आहे.
मागून येऊन या दोन्ही मतदार संघ अधिक प्रगत झाले आहेत. कित्येक वर्षांपासून पिंपरी विधानसभा मतदार संघाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यासाठी नगरसेवक शैलेश मोरे यांनी 2019साठी कार्यकर्त्यांच्या, येंथील पिंपरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या इच्छेसाठी आमदारकी लढविणार आहेत.