प्रत्येक महाविद्यालयाने अ‍ॅँटी रॅगिंग समिती स्थापन करावी

0

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या प्राचार्यांना बैठकीत सुचना ; खूनाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस दल अलर्ट ; तक्रारपेटीसह उच्च दर्जाचे कॅमेरे बसविण्याचेही आदेश

जळगाव : मू.जे.महाविद्यालयातील मुकेश सपकाळे यांच्या खुनाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस दल अलर्ट झाले आहे. यानंतर भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पावले उचचली जात आहे. त्याचाचा एक भाग मंगळवार जिल्हा अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात शहरातील महाविद्यायांचे प्राचार्य तसेच त्यांचे सुरक्षेसंदर्भात लक्ष नियंत्रित करणार्‍या कर्मचार्‍यांसह पोलीस निरिक्षकांची बैठक झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी प्राचार्यांना शाळा महाविद्यालयामध्ये तक्रारीसाठी तक्रारपेटी ठेवण्यात यावी, उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत महाविद्यालयाच्या प्रवेशव्दार तसेच निर्गमनव्दार येथे सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र पाहुनच आत प्रवेश द्यावा, प्रत्येक महाविद्यालयाने अ‍ॅँटी रॅगिंग समिती स्थापन करावी तसेच महाविद्यालयाचाच विद्यार्थी असल्याचा गणवेश निश्चित करावा तसेच ओळखपत्राशिवाय कोणालाच प्रवेश देवू नये अशा सूचना केले. यावेळी प्राचार्यांनी काही अडचणी तसेच समस्यां सांगितल्या. त्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत दक्ष असावे. कॉलेज लेक्चरला उपस्थित न राहता कॉलेज परिसरातच विद्यार्थी फिरत राहणार नाही,याची दक्षता घेतली जावी. कॉलेज परिसरातील रोड रोमीयो तसेच भरधाव वाहन चालविणार्‍या विद्यार्थ्यांना सिक्युरिटी गार्डने जाब विचारून माहिती संबधीत पोलीस स्टेशनला तात्काळ द्यावी,कॉलेजमध्ये गॅदरिंग आयोजित केली जात असल्यास त्याबाबत आगाऊ माहिती संबधित पोलीस स्टेशनला द्यावी. तसेच कॉलजेमधील असलेल्या विद्यार्थ्यांच्या निवडणुक प्रक्रियेबाबत कॉलेज प्रशासनाने संबधीत पोलिस ठाण्यात माहिती द्यावी अशाही सुचना डॉ.उगले यांनी महाविद्यालयातील कर्मचार्‍यांसह प्राचार्यांना दिल्या.

पोलीस मित्र करणार स्थापन
महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची गस्त वाढविण्यात येणार असून संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाजयांनीही त्यांच्या कर्मचार्‍यांची गस्त वाढवून महाविद्यालय व पोलीस प्रशासन यांच्यातील समित्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अ‍ॅप गृप तयार करावा, शिवाय या समित्यांच्या बैठका नियमित घेऊन त्यातील सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. विद्यालयातील प्रत्येक गोष्टीची खबर मिळावी, यासाठी पोलीस मित्रही तयार करावेत, अशा सुचना यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

या अधिकार्‍यांची होती उपस्थिती
बैठकीला पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, विठ्ठल ससे, रणजीत शिरसाठ, देविदास कुनगर, पंकज पवार,सुभाष कावरे, सहायक निरीक्षक संदीप आराक, नितीन चव्हाण,सचिन बागुल, संदीप पाटील यांच्यासह प्राचार्य ए.जी.मॅथीव, प्रा.ए.जे.पाटील, डॉ.विजय वानखेडे, प्रा.के.पी.चव्हाण, जे.आर.गोसावी, डॉ.शिल्पा बेंडाळे, अमोल लांडगे, अनुप कुलकर्णी, योगेश जोशी, वृषाली नेवे, सचिन पाटील, सतीश कोगटा, प्रा.डॉ.डी.वाय.हिवरे, डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.बी.यु.रेड्डी, आर.पी.पगारे, एम.बी.मोरे, ए.आर.राजपूत, डी.एस.जोशी, गणेश पाटील, आसिफ इब्राहीम खान, ए.वाय.सूर्यवंशी, जितेंद्र शिंदे, एस.डी.वढोदकर यांच्यासह रायसोनी इंजिनिअरीग महाविद्यालय, गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी महाविद्यालयसह शहरातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.