प्रत्येक यशस्वी महिले मागे पुरूषाचा हात

0
प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे ; वरणगाव युवा संस्थेतर्फे कार्यक्रम
वरणगाव :- प्रत्येक यशस्वी महिले मागे पुरुषाचा हात असतो, असे मत प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी येथे व्यक्त करीत महिलांनी सक्षम होवून शिक्षण घेण्याची गरज असून गृहिणी न राहता समाजासाठी काहीतरी करावे, असे आवाहन त्यांनी येथे महिलांना केले. वरणगाव येथील आंनद महिला फाऊंडेशन व वरणगाव युवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
गावातील कर्तृत्वान पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी संगीत खूर्ची, प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम घेण्यात आले. लहान मुलींनी राणी लक्ष्मीबाई, माता सावित्रीबाई, जिजाऊ, प्रतिभा पाटील व मलाला आदींची वेशभूषा साकारली.  याप्रसंगी वंदना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रतिभा तावडे  तर आभार सविता माळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरूंधती देशमुख, सुनीता भोई, उषा शेळके, निर्मला गांवडे, वंदना पाटील, योगीता माळी, कस्तुराबाई इंगळे, सरूबाई वाघमारे, शमा गोरले, शोभा जैन, लक्ष्मीबाई बैरागी, वंदना मराठे, वैशाली मराठे, प्रनिता पाटील, शांताबाई साबळे, ज्योती शिंगार, अश्विनी जोशी, रंजना पाटील, उषा तावडे व युवा बहुउद्देशीय संस्थेचे शंकर पटेल, गजानन वाघ, जितेंद्र तावडे आदींनी परीश्रम घेतले.