प्रत्येक व्यक्तिमध्ये दडलाय एक छुपा चित्रकार ; सर्जनशिलतेला मिळाले व्यासपीठ

0

शहादा । भोईराज युवा मंचने भव्य चित्रकला स्पर्धा घेतली.215 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून,अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि प्रत्येक व्यक्तित एक छुपा चित्रकार दडलेला असतो त्यातील चित्रकाराला चित्रनिर्मितीचा आनंद घेता यावा. समाजातील विदयार्थी व समाजबंधू भगिनींसाठी भोईराज भवनच्या मोकळ्या शेडमध्ये निसर्गाच्या प्रसन्न वातावरणात भोईराज युवा मंचने घेतलेली चित्रकला स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली.

चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेले विजेते पुढीलप्रमाणे
पहिला गट- मुलगा 1- हिमांशु हिम्मत वाडीले 2- दक्ष प्रवीण खेडकर 3- सोहन शरद साठे 4- मोहित हिम्मत वाडीले मुलगी- 1- योगेश्वरी रवींद्र शिवदे 2- विद्या प्रवीण खेडकर3- दिव्या मोहन साठे4-धनश्री प्रकाश वाडीले.दुसरा गट- मुली 1- जिग्नेशा गुलाबराव सोनवणे 2- हर्चना जगन मोरे 3- हेमलता रामलाल वाडीले4-दीपाली सुरेश नुक्ते मुले- 1- जय भरत खेडकर 2- ललित हिम्मत मोरे3- तुषार चिंतामण मोरे4- तेजस राजू भोईतिसरा गट- मुली, 1- जयश्री पितांबर मोरे2- रोशनी रामचंद्र वाडीले3- ज्योती चुनीलाल वाडीले4- अश्विनी हेमंत तावडे मुले- कपिल छोटूलाल भोई, 2- राहुल भरत भोई 3- प्रकाश रामा मोरे 4- दीपक सुपडू खेडकर.

स्पर्धेत ठेवण्यात आले तीन गट
स्पर्धेला प्रचंड उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रकला स्पर्धेत लहान मोठे असे 215 स्पर्धक सहभागी झाले.स्पर्धेत विद्यार्थीवर्ग व गृहिणींनीसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.या स्पर्धेत तीन गट ठेवण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल लागलीच जाहीर करण्यात आला. आणि विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लागलीच बक्षिस वितरण करण्यात आले.स्पर्धेच्या सुरुवातीला गुरुवर्य संत शिरोमणी श्री भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून चित्रकला स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.प्रतिमापूजन शहाद्याचे नगर सेवक संजय साठे, समाज अध्यक्ष अशोक शिवदे, जयवंत मोरे, प्रा.वाडीले सर,उमाकांत शिवदे, किशोर मोरे, योगेश खेडकर, भोईसमाज महिला आघाडी सचिव सुवर्णा साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

भोईराज भवन गजबजले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मोहन मोरे यांनी केले. तर स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री पाटील यांनी काम पाहीले. या शानदार स्पर्धेचे आयोजन मोहन साठे, मिलिंद वाडीले, धनेश्वर तामसे, किशोर मोरे, यश वाडीले, नयन तावडे, हेमंत तावडे, बाळा साठे, नंदिनी मोरे , पायल खेडकर आदींनी परिश्रम घेतले. या रंगारंग स्पर्धेमुळे सहभागी स्पर्धक, त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार व चित्रकला विषयक रूची असणारे रसिकांच्या उपस्थितीने भोईराज भवन गजबजून गेले होते. भोईराज युवा मंचने आतापर्यत समयोचित आणि समाजोपयोगी असे 30 उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविले असून युवा मंच च्या तरुणांचा ऊर्जस्वल उत्साह प्रत्येक कार्यक्रमात ठळकपणे दिसून येतो.