प्रदर्शनात ठेवलेल्या सामनाची आरसीबीची चोरी

0

बैगळुरू। रॉलल चॅलेजर्स बैगळुरूच्या संघाने आपल्या घरच्या मैदान एम.चिन्नास्वामी मैदानावर ठेवलेल्या प्रदर्शनातून काही वस्तु चोरीला गेल्याचे वृत्त आहे.आरसीबीचे चाहत्या घरच्या मैदानावर सामना बघण्यासाठी येतात त्याच्यासाठी आयपीएलच्या गेल्या 10 वर्षाचा प्रवास या प्रदर्शनातील वस्तु पाहून काहानी लक्षात येते. आरसीबीच्या व्यवस्थापनाने हे प्रदर्शन आयपीएल सीझनला ऐतिहासिक बनण्याची तयारी केली होती.त्यासाठी कर्नाटक क्रिकेट असोिएयशनच्या सुत्राकडून दिलेली माहिती अशी की, हे सामान मैदानाच्या चौथ्या मजल्यावरील पी-कॉर्पोरेट भागात ठेवण्यात आला होता. त्याला फायबरच्य काचाचे आवरण लावण्यात आले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांना ते पाहता येईल आणि तो सामान सुरक्षित राहिल.8 एप्रिल रोजी रॉयल चॅलेजर्स बैगळुरू आणि दिल्ली डेयरडेविल्स याच्या सामना खेळलां गेला.त्यानंतर दोन दिवसांनी या सामानाची चोरी झाली आहे.

सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेवून तक्रार
या सामन्यात बैगळुरू संघाने दिल्ली संघाचा पराभव केला होता. या सामन्यानंतरच सामानाची चोरी झाली आहे. आरसीबीचा संघ व व्यवस्थापन 14 एप्रिल रोजी होणार्‍या सामन्याच्या तयारी करित आहे. त्यावेळेस त्यांना याची माहिती मिळाली. या घटनेनंतर कर्नाटक क्रिकेट असोशिएयनने सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेवून या घटनेची तक्रार दिली आहे. आरसीबी संघाचे व्यवस्थानाचा विश्‍वास आहे की, तो जो कोणी आहे,त्याला येथील संपुर्ण माहिती असून त्याला या सामानाचे महत्व माहित आहे.मोकळ्या वेळी या ठिकाणी लॉक केलेले असतो.येथील वस्तु सामन्यावेळी नाही तर त्याच्या दोन दिवसांनी चोरीला गेला आहे. आरसीबी संघाच्या प्रदर्शनात गेल्या 10 वर्षाची प्रवास लक्षात येतो. गेल्या 10 वर्षात आरसीबी संघासाठी राहुल द्रविड, युवराज सिंह, विराट कोहली, टाइमल मिल्स, क्रिस गेल यासारखे खेळाडू खेळले आहे. या खेळाडूनी वारपलेल्या साहित्य या प्रदर्शनात ठेवले आहे.त्यात या खेळाडूनी वापरलेल्या बॅट व चेंडू प्रदर्शनात ठेवले आहे.या सामनाची चोरी झाल्यावरून हे स्पष्ट होते की, येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही.

मैदानाच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह?
आरसीबीच्या मैदानात आरसीबीचा 10 वर्षाच्या काळाचे प्रवास व त्यातील खेळाडूनी वापरलेल्या वस्तुचे प्रदर्शन भरविले आहे.मात्र तेथुन चोरी झाल्यावर सीसीटिव्ही असतांनाही चोरी होणे हा मोठा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.त्याचबरोबर मैदानावर सुरक्षा व्यवस्था असतांनाही चोरी झाली.त्यामुळे अजुनच याबद्दल प्रश्‍न उपस्थित होत आहे.सुरक्षेवर बोट ठेवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक असतांना असा प्रकार घडणे म्हणजे ती सुरक्षा किती जागृत आहे.असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.