सणसवाडी । शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल शिक्रापूर येथील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रदिप धुमाळ यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या 50 विद्यार्थ्यांना धुमाळ यांनी यशस्वी मार्गदर्शन करून गुणवत्ता यादीत झळकवले. त्यातील 4 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकावले. प्रज्ञाशोध परीक्षेत अनेकदा त्यांनी यश संपादन केले आहे. तसेच अवघ्या वर्षभरात शाळेला नावलौकीक प्राप्त करून दिला. यामुळे पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, शिक्षणाधिकारी शैलजा दराडे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत धुमाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे धुमाळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.