फैजपूर । मधुकर सहकारी साखर कारखान्याने दिल्ली येथील केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेचे पालन करीत प्रदुषणाची टक्केवारी दर्शविणारी ऑनलाईन मॉनिटरींग यंत्रणा जानेवारी 2017 मध्ये कार्यान्वित केलेली आहे. ती यंत्रणा नवी, दिल्ली येथील केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याशी जोडली गेली असून दर 15 मिनीटाला प्रदुषणाबाबतची माहिती मंडळाला जात आहे. तसेच सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे नुतनीकरण करुन सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्घाटन चेअरमन शरद महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए.एम. करे, क्षेत्रिय अधिकारी नितीन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संचालक महेश सगरे, यज्ञेश्वर अत्तरदे, के.व्ही.पाटील, के.डी. जावळे, शरद जावळे, सुनिल कोलते हजर होते.