प्रदूषणमुक्त भुसावळसाठी 27 रोजी सायकल मॅरेथॉन स्पर्धा

0

भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे ‘प्रदूषणमुक्त भुसावळ, स्वच्छ भुसावळ’ हा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार, 27 रोजी पहाटे साडेसहा वाजता सायक्लोथॉन (सायकल मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा असून आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून स्पर्धेला सुरुवात होईल. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड स्पर्धेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करतील. कार्यक्रमानंतर सोडत काढून भाग्यवान विजेत्यास दोन सायकल व हेल्मेट भेट देणार आहेत. अ‍ॅटलस व राठी सायकल मॉल, जळगाव हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. 12 वर्ष व त्यावील मुले, नागरीक या स्पर्धेत सहभाग होवू शकणार असून स्पर्धेत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सोनू (महेंद्र) मांडे, सचिव डॉ.मकरंद चांदवडकर, प्रोजेक्ट चेअरमन विशाल ठोके यांनी केले आहे.