प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने उचलली ही पाऊले

0

नवी दिल्ली- दिल्लीला सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. मात्र त्यात अपेक्षित यश येत नसल्याचे दिसते. दरम्यान आता दिल्ली सरकारने प्रदूषणावर मात करण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासह नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली सरकारने नवीन ३००० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मेट्रोच्या एका टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे.