जळगाव । पंतप्रधान तसेच इलेक्ट्रिकल अॅक्ट 2003 यांच्या मतानुसार प्रदूषणावर मात करण्यासाठी, प्रत्येक पेट्रोल स्टेशनवर चार्जिंग स्टेशन उभारणे अनिवार्य आहे, असा संकल्प करण्यात आलेला आहे. तसेच दैनंदिन जीवनांमध्ये वाहतूक करीत असताना विविध इंधनावर चालणार्या मोटारसायकलमुळे होणारे प्रदूषण तसेच जागेची कमतरता यावर मातकरण्यासाठी प्रदूषण विरहित घडी करण्याजोगी इलेक्ट्रिकल मोटारसायकलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
उपकरणांचे फायदे
इलेक्ट्रिक मोटारसायकलचे वजन 20 किलो आहे, सुमारे 120 किलो वजन वाहत असून दोन तास चार्जिंग केल्यानंतर ती 35-40 किमीपर्यंत धावते. इलेक्ट्रिक मोटारसायकलची विशेष बाब म्हणजे ही मोटारसायकलप्रवासात कुठेही सुटकेस प्रमाणे घडी करून वापरण्या जोगी आहे. तसेच हिमोटरसायकल ए.सी. तसेच डी.सी. या दोन्ही विद्युत प्रवाहानी चार्जिंग करता येते.
यांचे लाभले मार्गदर्शन
या सर्व प्रात्यक्षिक स्थितीचा विचार करून एस.एस.बी.टी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल शाखेतील अंतिम वर्षातील अभिजीत तडके, ऋषिकेश ठाकरे,निखिल सुरवाडे, मयुरी इसाई, मृणाली झोपे या विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख प्रा.डॉ.पी.जे. शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हि प्रदूषण विरहित घडी करण्याजोगी इलेक्ट्रिकल मोटारसायकल तयार केलेली आहे. यासंशोधनाबद्दल प्राचार्य डॉ.के.एस.वाणी, प्रा.डॉ.एस.पी.शेखावत यांनी अभिनंदन केले. तसेच प्रा.डॉ. पी.वि.ठाकरे, प्रा.व्ही. एस.पवार, प्रा.एम.एम.अन्सारी, प्रा.एस.एम.शेम्बेकर, प्रा.डि.एस.पाटील, प्रा.एन.एस.महाजनआदींचे मार्गदर्शन लाभले.
अशी केली दुचाकी
इलेक्ट्रिक मोटारसायकलचा लोखंडापासून घडी करण्याजोगा गाडीचा ढाचा तयार करण्यात आला असून त्यामध्ये 24 व्हॉल्ट बॅटरी तसेच झचऊउ मोटरवापरण्यात आली आहे. सोबतच ऍक्सिलेटर,चाक व इलेक्ट्रॉनिक्स साहित्यलागले असून अंदाजे 10,000 पर्यंत खर्च लागला आहे. रामुळे वाढत्रा प्रदूषणाला आळा बसून रस्त्रावर धावणार्रा वाहनांमध्रे जागृती होणार आहे.