प्रदेश अध्यक्ष तटकरेंचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन

0

शहादा । तालुका राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकत्यांचा मेळावा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कु. गावीत यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आला. येत्या 14 जुलै रोजी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व आमदार अजित पवार हे नंदुरबार दौरा करणार असुन कार्यकर्त्यांनी मान्यवराचा दौरा यशस्वी करुन मोठ्या संखेने उपस्थित रहाण्याचे आवाहन राजेंद्र्कुमार गावीत यांनी मेळाव्यात केले. यावेळी प. स सभापती दरबारसिग पवार, जिल्हा सरचिटणीस अनिल भामरे, युवा अध्यक्ष डॉ. आनंद पाटील, प. स. सदस्य बाबुराव पवार, भाईदास बागले, कैलास वसावे, शिवाजी मालचे, नगरसेवक इकबाल शे. सलीम ,युवा उपाध्यक्ष मंगेश सुळे, विजय मोरे, धरमसिंग पावरा ,ईश्वर पटेल, सुभाष पटले, जगदीश पाटील, ए आर.अंतुले, रतिलाल पवार, विजयसिंग गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व आमदार अजीत पवार, नंदुरबार जिल्ह्याचा दौर्‍यांवर येत असुन 13 जुलैला नंदुरबार मुक्कामी, 14 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 जिल्हा प्रभारी व निरीक्षक जिल्ह्यातील आजी माजी प्रमुख नेते व स्थानिक स्वराज संस्थेतील पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा घेवुन पक्षाचा वाटचालीबाबत मार्गदर्शन पर मेळाव्याला संबोधीत करणार आहेत.