प्रदेश काँग्रेसचे 12 सेल बरखास्त

0

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून प्रदेश काँग्रेसच्या अखत्यारित असलेले 12 सेल सोमवारी प्रदेश सरचिटणिस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी बरखास्त केले. लवकरच या रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. लवकरच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार आहे.

नागरी विकास, निराधार व निराश्रीत व्यक्ती विकास, असंघटित कामगार सेल, भटक्या जाती व विमुक्त जमाती, सफाई कामगार सेल, सामाजिक न्याय विभाग, उच्च तंत्रशिक्षण सेल, शिक्षक सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सांस्कृतिक विकास सेल, रोजगार व स्वयंरोजगार सेल आणि कच्छी गुजरात सेल यांचा यात समावेश आहे. याशिवाय पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या अखत्यारित येणार्‍या सहा सेलही बरखास्त कराव्यात अशी शिफारस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्रीय कार्यकारिणीकडे केली आहे.