प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार

0

जळगाव। प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येक गरजवंतांना 2022 पर्यंत हक्काचे घर मिळतील. त्यामुळे गरिबांसह झोपडपट्टीत राहणार्‍या व्यक्तींचे जीवनमान उंचवणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली. जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेही करता येणार आहे. यामुळे प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगितले. मंत्री ना. रामदास आठवले यांच्याहस्ते लाभार्थींचा नोंदणीचा फॉर्म भरण्यात आला.

2 लाख रूपयांचे सबसिडी शासनाच्या माध्यमातून मिळणार
शहरातील रामेश्‍वर कॉलनी येथील इंद्रप्रस्थ भवनात आयोजित प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत फार्म नोंदणी मोहीमचे उद्घाटन करतांना ना.आठवले बोलत होते. प्रभाग क्र. 8 मधील नगरसेवक श्री.पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून परिसरातील गरजू भाडेतत्वावर राहणारे व तसेच निराधार व्यक्तींना या योजनेंतर्गत 2 लाख रूपयांचे सबसिडी शासनाच्या माध्यमातून मिळणार. यासाठी नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन, खासदार ए.टी.नाना पाटील. खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंदुभाई पाटील, स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर नितीन लढ्ढा, मनपा सभापती वर्षा खडके, नगरसेवक अनिल देशमुख रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, रिपाईचे आबा मकासरे, काकासाहेब खंबाळकर, अडकमोल यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात सामाजिक सलोखा व एकता निर्माण झाली असून आपण सर्व जनतेने समाजातील हिंदू, मुस्लीम, शीख, इसाही, दलित, मागासवर्गीय समाजाला बरोबर घेऊन सर्वांना समान हक्क न्याय मिळवून देण्याचे काम प्रधानमंत्री करीत आहे. तसेच येत्या दोन वर्षात याचप्रमाणे उपक्रम राबविणार असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घुगे-पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेश युवा सरचिटणीस गीतांजली ठाकरे, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, शिवदास साळुंके, महेश जोशी, महिला अध्यक्षा जयश्री पाटील, अनु.जाती मोर्चा अध्यक्षा ज्योती ताई निंभोरे, बापू ठाकरे, प्रा.जीवन अत्तरदे, महेश ठाकूर, राजेंद्र मराठे, किशोर वाघ, राहुल लष्करे, भगतसिंग पाटील, नितीन गायकवाड, मनोज भांडारकर यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याला तांबापुर, रामेश्वर कॉलनी, मेहरूण, अक्सा नगर, मास्टर कॉलनी, या भागातील महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या.