पहूर। ग्रामीण भागात अनेक महिलांना चुलीवर स्वयंपाक करीत असतांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. जळावू इंधनासाठी उभी झाडे पाडून टाकतात यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. निसर्गाचा समतोल रहावा व गोरगरीब महिलांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून बीपीएल कार्डधारक महिलांना मोफत गॅस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी केले.
दोन हजार महिलांची प्रतिक्षा यादी
राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार रक्षाताई खडसे, क्षेत्रीय प्रबंधक अमित नरूला, सेल्स ऑफीसर निलेश लथ्थे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. आतापर्यंत 1 हजार महिलांना गॅस वाटप झाला असून अजून दोन हजार महिलांची प्रतिक्षा यादी आहे. त्यांनाही लवकरच गॅस वाटप होणार असल्याचे तिरूपती भारत गॅस ग्रामीण वितरकचे संचालिका निता पाटील यांनी सांगितले.
गावागावात जनजागृती
गेल्या वर्षभरापासून देशातील प्रत्येक घरात गॅसची जोडणीसाठी अभियान सुरू असून केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याला पाठपुरावा म्हणून जिल्हा प्रशासनाचा मोठा सहभाग असून प्रत्येक गावात जावून तपासणी करून अल्पदरात गॅसची जोडणी करण्यात येत आहे. वर्षभरात गॅस जोडणीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
यांची होती उपस्थिती
पहूर येथे तिरूपती भारत गॅसतर्फे 2011 च्या बीपीएल यादीनुसार पात्र 156 लाभार्थी महिलांना मोफत गॅसचे वाटप जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचेे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आण्णापिसोडे, उपसभापती गोपाल नाईक, बाबुराव पाटील दिपक तायडे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार रामेश्वर पाटील यांनी तर प्रास्ताविक विशाल बेढे यांनी मानले.