हडपसर : प्रा. ग. प. प्रधान मास्तरांच्या आठवणींना उजाळा देणार्या प्रधानमास्तर, सहावासातील स्मृती या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ न पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकांत गोयल, उद्योगपती शरदचंद्र पाटणकर, नितीनभाई देसाई, राजेश शहा, डॉ. विनोद शहा, पद्मविभूषण डॉ. के. संचेती, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे आदी उपस्थित होते.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. प्रा. ग. प्र. प्रधान यांची प्रधान मास्तर अशी ओळख आजही सर्वांना परिचित आहे. त्यांनी सदाशिव पेठेतून थेट हडपसरमधील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये वास्तव्य केले. त्यांचा शेवटचा काळ हडपसरमध्ये गेला. त्याच्या या काळात सहवासात आलेल्या व त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झालेल्या काही व्यक्तीच्या आठवणी या पुस्तकात घेण्यात आल्या आहेत.
या पुस्तकास स्व. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांची प्रस्तावना लाभली असून, स्व. रामभाऊ तुपे यांनी प्रधान यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला लेख आहे. तसेच डॉ. विनोद शहा, प्रा. जे. पी. देसाई, सुधीर मेथेकर, डॉ. शुभांगी कुर्हाडे, डॉ. शुभांगी कुलकर्णी, अनिल गुजर, सुभाष वारे, मेहबूब मोहीम तुल्ले, राजेंद्र बहाळकर, भालचंद्र देशपांडे, अशोक बालगुडे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.