मुंबई : प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई व प्रधान मुद्रांक कार्यालयामार्फत सुरु असलेले मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील मुद्रांक विक्री केंद्रामार्फत होणारी मुद्रांकाची विक्री शुक्रवार, दिनांक 31 मार्च 2017 रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार असल्याची माहिती अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांनी दिली आहे.
या मुद्रांक विक्री केंद्रावरील पदसिद्ध मुद्रांक विक्रेत्यांमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या मुद्रांकाची 31 मार्च 2017 रोजी सहामाही पडताळणी करण्यात येणार असल्याने या केंद्रांमार्फत होणारी मुद्रांक विक्री बंद ठेवण्यात येत असल्याची माहितीही अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांनी दिली आहे.