नवी दिल्ली: यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या आधी मागील शनिवारी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र ईडीसमोर ते हजर झाले नाहीत. आता ईडीने प्रफुल्ल पटेल यांना १० किंवा ११ जून रोजी हजर रहाण्यासंबंधी समन्स बजावले आहेत. आधीच्या समन्समध्ये ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांना ६ जून ही तारीख देण्यात आली होती. मात्र तेव्हा ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. आता त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.