भुसावळ : संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर (बापूराव) मांडे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त त्यांची पुस्तकतुला व विशेषकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, प्रभाकर (बापूराव) मांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक शशीकांत महाजन, भास्करराव मांडे व मांडे परीवारातील सदस्यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी मनोगतातून बापूरावांच्या कार्याला उजाळा दिला.