पिंपरी : महापालिकेत सत्ताबदलानंतर खर्च बचतीच्या उद्देशाने भाजपच्या काही पदाधिकार्यांनी महापालिकेचे वाहन नाकारण्याचा निर्णय घेतला होता. हा उद्देश समोर ठेवून क प्रभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नम्रता लोंढे यांनी महापालिकेचे वाहन नाकारून स्वत:चे वाहन वापरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भात नम्रता लोंढे म्हणाल्या की, माझ्याकडे स्वतःची गाडी आहे. त्यामुळे मी माझ्या खाजगी गाडीचा वापर करणार आहे.
महापालिकेला एका गाडीवर दीड-दोन लाख रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे या खर्चाची बचत व्हावी. तो महापालिकेच्या इतर कामांसाठी वापराला जावा. म्हणून, मी महापालिकेचे वाहन नाकारले आहे. तसेच, पक्षातर्फे एक सकारात्मक संदेश जनतेत जाणे गरजेचे आहे. कारण जनतेने जो विश्वास ठेवला आहे. तो आम्हाला सार्थ करायचा.