प्रभाग क्रमांक 18 आणि 19 च्या दौर्‍याने उपमहापौरांच्या अभियानाचा समारोप

0

गरज भासल्यास प्रभाग समिती भेटीचेही नियोजन करणार

जळगाव: उपमहापौर आपल्यादारी या अभियानांतर्गत जळगांव शहरातील 1 ते 19 प्रभागांना क्रमशा भेटी देण्याच्या सत्राचा आज प्रभाग क्रं. 18 आणि 19 च्या दौर्‍याने समारोप झाला. या दौर्‍यामुळे अनेक भागात लहान-मोठी कामे होऊन समस्या कमी झाल्याने नागरीकांत समाधान व्यक्त होतांना पाहायला मिळतेय. महानगरपालिका यंत्रणा कामाला लागली असून, साफसफाई, गटारीतील गाळ उपसणे, कचरा उचलने, रस्त्यावरील खड्डे बुजणे, किरकोळ अतिक्रमणांचे निर्मुलन, बंद स्ट्रिट लाईट सुरु होणे आदी स्वरुपाची कामे पूर्ण केली जात आहेत. आलेल्या तक्रारी दूर केल्याचे अहवाल व फोटो अधिकारी यांच्याकडून प्राप्त होत असल्याचे उपमहापौर सुनील खडके यांनी सांगितले आहे. याउपरही काही कामे प्रलंबित राहिली असल्यास त्यांचा पाठपुरावा करुन निपटारा करण्यासाठी प्रभाग समिती भेटींचे नियोजन केले जाईल असेही उपमहापौर सुनिल खडके म्हणाले.

उपमहापौर यांनी जळगांव शहराच्या प्रभाग क्रं. 18 आणि 19 चा आज दौरा केला. महिला व बालकल्याण समिती सभापती . रंजना भरत सपकाळे, प्रभाग समिती सभापती मनोज आहुजा, यांच्यासह नगरसेवक इब्राहीम पटेल, जिजाबाई भापसे, गणेश सोनवणे,रियाज बागवान, सुन्नाबी देशमुख, सईदा युसूफ शेख, माजी नगरसेवक मनोज काळे, यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी त्यांचे समवेत होते. स्वच्छतेचा अभाव, रस्त्यावरील कच्ची पक्की अतिक्रमणे पक्क्या गटारीअभावी चार्‍यामधुन इतरत्र सोडण्यात आलेले सांडपाणी, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री पसरणारा अंधार, रस्त्यांवरील खड्डे अशा स्वरुपाच्या समस्या यावेळी आढळुन आल्या. सकाळी 9.00 वाजता संतोषी माता मंदीरापासुन दौर्‍याला सुरुवात झाली. विविध परिसरासह सुप्रिम कॉलनीला उपमहापौरांनी भेट दिली.मास्टर कॉलनी भागात गटारींवर ढापे टाकण्यासह काही ठिकाणी रोड कर्ल्व्हट टाकण्याच्या सुचना उपमहापौरांनी केल्या. संतोषी माता नगर भागातून जाणार्‍या मेन रोडला हायवेवर बोगदा वा सर्कल सोडण्याची मागणी रहीवाशांनी केली. महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश देण्यात आले.