नगरसेवक चेतन तुपे यांचे प्रतिपादन
हडपसर : निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनानुसार प्रभाग क्रमांक 22 मध्ये यावर्षी 20 कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून आगामी काळात या प्रभागास सर्वांगसुंदर प्रभाग करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष नगरसेवक चेतन तुपे यांनी केले. प्रभाग क्रमांक 22 मध्ये 1 कोटी 30 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ चारही नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, निलेश मगर, नगरसेविका हेमलता मगर, पूजा कोद्रे, बाळासाहेब जाधव, विजय तुपे, सचिन मोरे, अनंता तुपे, साकेत पवार, विक्रम जाधव, राजेंद्र मारणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
पाणीपुरवठा सुरळीत करणार
या प्रभागात रस्ते काँक्रिटीकरण, ड्रेनेज, जलवाहिनी, यांची कामे सुरू आहेत. 24 बाय 7 पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही ठीकठिकाणी मोठ्या जलवाहिन्या टाकत असून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल. आगामी काळामध्ये समाज मंदिर व विविध प्रकल्पाचे काम हाती घेणार असून चारही नगरसेवक एकत्र मिळून आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे तुपे यांनी पुढे सांगितले. यावेळी माळवाडी, पारिजात सोसायटी, अण्णासाहेब मगर कॉलेज समोर, 15 नंबर, आकाशवाणी, डवरी नगर व सातव प्लॉट येथे विविध कामांचा शुभारंभ नगरसेवक व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.