प्रभाग क्रमांक 7 मध्ये जंतूनाशक फवारणी

0

जळगाव – आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत शिवकॉलनी येथून प्रभाग क्रमांक 7 मध्ये निर्जंतुकीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मनपा प्रभाग समिती सदस्य रविंद्र ( बंटी ) नेरपगारे यांनी स्वखर्चाने सोडियम हायपो क्लोराइडद्वारे संपूर्ण प्रभाग व परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न केला. त्याची सुरुवात आज सकाळी गणपती मंदिर येथून करण्यात आली. शिवकॉलनीच्या वेगवेगळ्या भागात फवारणी करण्यात आली. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांचे मार्गदर्शन लाभले.