प्रभाग निर्जंतुकीकरणासाठी नगरसेविकाचा पुढाकार

0

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 12 मध्ये निर्जंतुकीकरणाचे काम मनपा नगरसेविका गायत्री राणे यांनी स्वखर्चातून केले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. शासन वेळोवेळी ज्या सूचना देत आहे त्याचे पालन प्रत्येकाने करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.