प्रभाग समितींवर आता स्वयंसेवी संघटनांच्या सदस्यांनाही संधी

0

निवडीसाठी 6 रोजी सभा,12 सदस्यांची होणार निवड


जळगाव-मनपाच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये
े प्रत्येकी 3 स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी दि.6 रोजी सभा होणार आहे. प्रभाग समित्यांवर आता नगरसेवकांव्यतिरिक्त तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आहे. यात स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना संधी मिळणार आहे.
प्रभाग समितीवर सदस्य निवडीसाठी दि.6 रोजी महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात चारही समित्यांच्या सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान सभा होईल. प्रभाग सभापती चंद्रशेखर अत्तरदे, रंजना सोनार, सुरेखा सोनवणे व विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहेत. यात समितीकडे आलेल्या प्रस्तावांमधून प्रत्येक समितीसाठी 3 जणांची निवड केली जाणार आहे.

स्वयंसेवी संस्थांच्या 36 प्रतिनिधींचे अर्ज
महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांवर प्रत्येकी 3 प्रमाणे 12 सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या 36 प्रतिनिधींचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.या प्रभा समिती 1 साठी 12 अर्ज, प्रभाग समिती 2 साठी 12 अर्ज, प्रभाग समिती 3 साठी 5 अर्ज तर प्रभाग समिती 4 साठी 7 अर्ज आले आहेत.