चारही प्रभाग समित्यांमध्ये स्वतंत्र निविदा काढण्याची भूमिका
जळगाव– मनपा प्रभाग समिती क्रमांक 1 ची सभापती डॉ.चंदशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. यावेळी साफसफाईचा आढावा घेवून सफाईसाठी चारही प्रभाग समित्यांमध्ये स्वतंत्र निविदा काढण्याची भूमिका प्रभाग समिती 1 मधील नगरसेवक व सदस्यांनी मांडली. बैठकीला नगरसेवक नवनाथ दारकंडे, सचिन पाटील, अॅड. दिलीप पोकळे, सरिता नेरकर, प्रतिभा पाटील,प्रिया जोहरे,मनोज भांडारकर,रविंद्र नेरपगारे,उपायुक्त मिनिनाथ दंडवते,प्रभाग अधिकारी व्ही.ओ.सोनवणी उपस्थित होते.
शहरातील साफसफाईबाबतचा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी आराखडा तयार केला. या आराखड्यावर चर्चा करुन त्यातील त्रुटी दूर करण्याची सुचना सदस्यांनी केली. तसेच साफसफाईबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. यावेळी सभापती डॉ.चंदशेखर पाटील यांनी आरोग्याचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची सुचना दिली.