पिंपरी -चिंचवड :- महापालिकेच्या आठही प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. शुक्रवारी पालिकेच्या मधुकर पवळे सभागृहात निवडणूक झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसने एकाही समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी सर्वांचा सत्कार केला.
हे बनले अध्यक्ष
भाजपच्या अनुराधा गोरखे (’अ’ प्रभाग) करुणा चिंचवडे ( ’ब’ प्रभाग) नम्रता लोंढे (’क’ प्रभाग), शशिकांत कदम (’ड’ प्रभाग), भिमाबाई पोपट फुगे (’इ’ प्रभाग), कमल घोलप (’फ’ प्रभाग), बाबासाहेब त्रिभुवन (’ग’ प्रभाग) आणि अंबरनाथ चंद्रकांत कांबळे (’ह’ प्रभाग) यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, भाजपने शशिकांत कदम, भिमाबाई फुगे आणि अंबरनाथ कांबळे यांना पुन्हा एकदा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी संधी दिली आहे.