जळगाव । महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. प्रभाग क्र.1 साठी सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासन अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सचिन पाटील यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, नगरसचिव अनिल गोराणे उपस्थित होते. जळगाव महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होेत आहे. प्रभाग क्रमांक 1 साठी भाजपाच्या बंडखोर गटाचे सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केले.