जळगाव। महानगर पालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळा संपत असल्याने सभापती निवडीसाठी आज शुक्रवार 31 मार्च रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. चारही प्रभांगासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने तसेच भाजपाने शेवटच्या क्षणापर्यंत अर्जच नेला नसल्याने चारही प्रभाग समिती सभापती निवड बिनविरोध होणे निश्चित झाले आहे. प्रभाग समिती क्र 1 साठी राष्ट्रवादी काँगे्रसचे रविंद्र मोरे, प्रभाग समिती क्र. 2 साठी खाविआचे चेतन शिरसाळे, प्रभाग समिती क्र. 3साठी खाविआच्या संगिता राणे तर प्रभाग समिती क्र. 4साठी मनसेचे संतोष पाटील यांनी अर्ज दाखल केले.
सध्या खाविआकडे तीन व राष्ट्रवादीकडे एक सभापती पद
याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी सभापती वर्षा खडके, श्यामकांत सोनवणे आदी उपस्थित होते. सध्या खाविआकडे तीन व राष्ट्रवादीकडे एक सभापती पद आहे. यात सभापती प्रभाग समिती 1- दत्तू कोळी (खाविआ), प्रभाग समिती 2- इकबालोद्दीन पिरजादे (खाविआ),प्रभाग समिती 3- हेमलता प्रमोद नाईक (खाविआ), प्रभाग समिती 4- शोभा बारी (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. मागील वर्षी निवड झालेल्या सभापती यांनी वर्षभरात एकही सभा घेतलेली नाही. या प्रभाग समितींच्या सभापतींना त्यांच्या प्रभागात कर्न्व्हेंटर, रस्ता दुरूस्ती आदी किरकोळ खर्च करण्यासाठी निधी आरक्षित असतो. सभापतींना वर्षाभरासाठी 10 लाख रूपये खर्च करण्यासाठी मिळत असतात. मात्र, मागील सभापतींनी एकही सभा घेतलेली नाही.