प्रभाग समिती 1 मध्ये तीन सदस्यांची निवड

0

जळगाव-मनपाच्या प्रभाग समिती 1 मध्ये नवीन सदस्य निवडीची कोरमअभावी तहकूब झालेली सभा आज सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नुतन तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात प्रभाग समिती 1 ची सभा पार पडली. यावेळी महापौर सीमा भोळे,प्रिया जोहरे,सरिता नेरकर,दिलीप पोकळे,रुकसानाबी खान,कांचन सोनवणे,नवनाथ दारकुंडे,गायत्री शिंदे,किशोर बाविस्कर,सचिन पाटील,प्रतिभा पाटील उपस्थित होते.सभेला सुरुवात झाल्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली.
त्यांनतर मनोज भांडारकर,रविंद्र नेरपगारे,जगदिश नेवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.सुचक म्हणून दिलीप पोकळे तर अनुमोदक म्हणून प्रतिभा पाटील यांची स्वाक्षरी आहे.दरम्यान,नुतन तीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.