काळेवाडी : शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. श्री. भाऊसाहेब तापकीर विद्यालयात स्वच्छता अभियान अंतर्गत शनिवारी (दि.6) प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळाचे सचिव मल्हारीशेठ तापकीर, मुख्याध्यापिका जयश्री पवार, उल्का जगदाळे, रवींद्र बामगगुडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण तापकीरनगर परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. बालचमूंपासून सातवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या अभियानात सहभाग घेतला होता. स्वच्छतेचे विविध संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा व जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.