प्रभात चौकाती कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

0

जळगाव – शहरातील प्रभात कॉलनी चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिल्याची घटना शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. जखमी दुचाकीस्वारास तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असुन जबाब नोंदवल्यावर सोमवारी रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील संभाजीनगर विवेक कॉलनीतील रहिवासी प्रदिप रघुनाथ जोशी (वय-35) त्याच्या मोपेड क्र (एमएच 19, बीडब्लू 9383)ने शनिवारी संध्याकाळी कामानिमीत्त शिव कॉलनी येथे आले होते, काम अटोपल्यावर महामार्गाने आकाशवाणी केंद्राकडे परत जात असतांना प्रभात कॉलनी चौकातील सिग्नल बंद असल्याने रांगेत उभे होते. समोरुन भरधाव वेगात आलेल्या कार क्र (एमएच 19, बीजे 8493)वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन उभ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात प्रदिप जोशी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार होवुन पोलिसांनी आज त्याचा जबाब नोंदवल्यावरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक विनोंद शिंदे करीत आहेत.