जळगाव। कट लागल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार तरूणास बेदम मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास प्रभात चौकात घडली. मात्र, पोलिस ठाण्यात वाद पोहचताच पोलिसांनी दोन्ही गटांना समजूत घातल्यानंतर वादावर पडदा पडला.
सोमवारी दुपारी प्रभात चौकातून एका मालवाहतुक वाहनाने दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करीत कट मारला. दुचाकीस्वाराने मालवाहतुक गाडी चालकास कट मारल्याचा जाब विचारल्यानंतर तेथे दोघांनामध्ये जोरदार वाद झाले. यानंतर मालवाहतुक गाडीचालकाच्या सात ते आठ ओळखीचे व्यक्ती त्या ठिकाणी येवून त्यांनी दुचाकीस्वारास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
या घटनेची माहिती रामानंदनगर व जिल्हा पेठ पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर रामानंदनगर पोलिसांनी दोन्ही चालकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत घातल्यानंतर वादावर पडदा पडला.