प्रभात चौकात विचित्र अपघात

0
जळगाव – शहरातील प्रभात चौकात विचित्र अपघात बस आणि कारचे नुकसान झाल्याची घटना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत ट्रक आणि कार चालकाविरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर-जळगाव बस (क्रमांक एमएच 14 बीटी 1648) ही बस शहरातील प्रभात चौकातून पुढे जात असतांना पुढे चालणारा ट्रक (क्रमांक एमएच 18 एए 8814) च्या समोर अचानकपणे इंडीगो कार (क्रमांक एमएच12 पीटी 7031) घसल्याने मगून येणाऱ्या ट्रकने ब्रेक मारला त्यामुळे बसच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच कारचेही मागच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले आहे. जळगाव-अमळनेर वरील बसचालक अमृत यमाजी पाटील (वय- 55) रा. अमळनेर यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.