प्रभासला श्रद्धाने मुंबईहून पाठविली खास भेट

0

मुंबई : श्रद्धा कपूर लवकरच ‘बाहुबली’ प्रभाससोबत ‘साहो’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. म्हणून तीचे हैदराबाद आणि मुंबईचे दौरे सुरू आहेत. नुकताच देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव साजरा झाला. मकर संक्रांतीनिमीत्त श्रद्धाने प्रभाससाठी मुंबईहून एक खास भेट पाठविली होती.

मकर संक्रांतीनिमीत्त श्रद्धाने तिळाचे लाडु बनविले होते. हे खास लाडू तिने प्रभास आणि साहोच्या टीमसाठी मुंबईहून हैदराबादला पाठविले आहेत. हैदराबादलाच ‘साहो’चे शुटिंग सुरू आहे. प्रभासलाही खाद्यपदार्थांची आवड आहे. ‘साहो’च्या सेटवर दोघेही एकमेकांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी शेअर करत असतात.