मुंबई : बाहुबली या नावाने ओळखला जाणारा दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याची क्रेझ नेहमीच पाहायला मिळते. आता सध्या सिनेसृष्टीत प्रभासच्या लग्नाबाबतची चर्चा सुरू आहे. तो केव्हा लग्न करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सूकता नेहमी असते.
‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये राणा दुगबत्ती, प्रभास आणि एस. एस. राजामौली यांनी हजेरी लावली होती. यावेळी करणने त्यांना प्रभासच्या लग्नाबद्दल प्रश्न केला. तर त्यांनी सांगितले, की प्रभास फार आळशी आहे. त्याला लग्नाच्या ज्या प्रथा असतात या सगळ्या गोष्टींमुळे तो लग्न करण्यास टाळाटाळ करतो असतो.