शिरपूर । साक्री तालुक्यातील बळसाळे येथील राजेंद्र गिरासे यांनी नुकतेच सैन्य दलातील लेप्टनंट अधिकारी पदासाठी शनिवार 9 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे आई वडिलांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीची पहिलीच घटना माळमाथा परिसरात बहुधा असावी या घटनेने बळसाणेसह माळमाथा परिसरात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे सिध्द झाले व प्रमोदच्या नियुक्तीचे राजपूत समाजबांधवांसह बळसाणे व माळमाथा परिसरातील जनतेने आपापसात पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलात जाण्याचा नुसता मनोदयच केला नाही तर त्याने सर्वच परीक्षा दिल्या आणि तो यशस्वी झाला देशसेवेचे व्रत हाती घेऊन सैन्यातच करिअर घडविण्याची केलेली भीष्म प्रतिज्ञा केली होती.
मार्तृसेवा व समाजसेवेला प्राधान्य देणार – प्रमोद
बळसाणे गावाला व आपल्या लहानल्या भावंडांना तसेच आई बाबांना दूर ठेवून अफाट क्षमता असलेल्या 22 वर्षाच्या तरूण प्रमोद याने बळसाणे गावामध्ये एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे प्रमोद हा देशसेवा, मार्तुसेवा व समाजसेवेला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती प्रमोदने भ्रमणध्वनीवरून ’दैनिक जनशक्ती‘ला दिली व प्रमोद गिरासेवर शुभेच्छाचा वर्षाव बळसाणे, हाट्टी, दुसाणे, कढरे, सतमाने, ऐचाळे, इंदवे, म्हसदी, लोणखेडी, आगरपाडा माळमाथा परिसरातून होत आहे.
बिकट परीस्थितीवर केली मात
साक्री तालुक्यातील बळसाणे येथील राजेंद्र खंडू गिरासे यांचे वडील सुरत येथे हिरा कारखान्यात कामाला असून घराची परिस्थिती बेताची असतांना देखील राजेंद्र यांचे सुपूत्र प्रमोद गिरासे याने गुजरात राज्यातील सुरत 12वी पर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षणाकरिता शहदा येथील डि.एन.पटेल कॉलेज ऑफ अभियांत्रिकसाठी प्रवेश घेतला आणि परिस्थितीवर मात करत थेट सैन्य दलातील लेप्टनंट अधिकारी पदासाठी 9 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे आई वडिलांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.