भुसावळ : प्रयागराज छिवकी स्थानकावर इंटर लॉकींगचे कामाचे नियोजन केल्यामुळे भुसावळ विभागातून धावणार्या सात रेल्वे गाड्या शनिवार, 12 मार्चपासून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 22947 सुरत-भागलपुर एक्सप्रेस ही गाडी 12 मार्च रोजी, गाडी क्रमांक 22948 भागलपूर-सूरत एक्सप्रेस 14 मार्च रोजी, गाडी क्रमांक 12519 लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्सप्रेस 13 मार्च रोजी, गाडी क्रमांक 82355 पटना-सीएसएमटी एक्सप्रेस 13 मार्च रोजी, गाडी क्रमांक 82356 सीएसएमटी-पटना एक्सप्रेस 15 मार्चला सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे शिवाय गाडी क्रमांक 19045 सुरत-छपरा एक्सप्रेस गाडी 13 मार्च रोजी रद्द करण्यात आली तसेच गाडी क्रमांक 19046 छपरा-सुरत एक्सप्रेस ही गाडी 13 व 15 रोजी रद्द करण्यात आली असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे.