साक्री । तालुक्यातील म्हसदी येथील प्रयोगशील शेतकरी शाम शंकर देवरे यांच्या शेतात लावलेल्या शेवगांच्या शेंगा प्रति किलो 91रूपये प्रमाणे व्यापार्याने खरेदी केल्या आहेत. चाळीस वर्षीय शेतकरी शाम शंकर देवरे यांनी आठ एकर शेतात ओडिसा नं.5 नावाचा शेवगा लावला आहे. काल दहा टन माल बडोदा येथील व्यापारी भाऊसाहेब महाले व इब्राहिम शेख यांनी प्रति 91रूपये किलो प्रमाणे खरेदी केला आहे. खरेदी केलेला हा माल दुबई येथे रवाना होणार असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. यापुर्वी देवरे यांनी डाळींबासह तुवर ,कपाशी आदीं वेगवेगळे वाण काढले. त्यामुळे त्यांचा आदश शेतकरी म्हणून गौरव करणयास आला.
देवरें प्रयोगशील शेतकरी
अस्थिर बाजार भाव,प्रतिकुल हवामान आदी कारणांनी शेती परवडत नसताना ही आशावाद न सोडता सातत्याने नवीन, नवीन प्रयोग करणारे शेतकरी खरे दिपस्तंभ असल्याचे देवरे यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातही ते आदर्श शेतकरी ठरले आहेत. यावेळी परिसरातील डॉ. संजय बागुल, डॉ. आर.व्ही. पाटील,डॉ.नितीन शिरोळे, आदर्श शेतकरी पुरस्कार पारपत राजेंद्र भामरे,भटू बेड़से,कृषी उतपनन बाजार समितीचे संचालक बारकू बेड़से,धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिंमतराव देवरे,ककाणीचे माजी सरपंच अशोक बेड़से,बबन बेड़से,नितीन ठाकरे,संदीप भामरे,उतम बेड़से,तिरूपती अॅगरोचे संचालक तुषार सावळे, रामराव हयाळीज,जगदीश हयाळीज,पंजाबराव देवरे,प्रविण देवरे,वैभव देवरे,सुरेश बेड़से,भटू वाणी,शरद देवरे,मुन्ना देवरे,भिमराव देवरे,मिलिंद देवरे आदीं उपस्थित होते.