नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या आढावा बैठकीत सूचना
जळगाव :- प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निपटारा करून जनतेत सलोख्याची भावना निर्माण करा, अशा सूचना नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी गुन्हे आढावा बैठकीत केल्या. जिल्हा दौर्यावर आलेल्या चौबे यांनी गुरुवारी सकाळी परेडचे निरीक्षक करीत लाईन इन्स्पेक्शन केले. प्रसंगी कर्मचारी दरबार भरवण्यात आल्यानंतर कर्मचार्यांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. दुपारी जिल्हाभरातील सर्व अधिकार्यांच्या उपस्थिती गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली.
गुन्ह्यांचा आलेख कमी का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केल्याचे समजते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह जिल्हाभरातील निरीक्षक उपस्थित होते.